Anusara shikavan buddhachi | अनुसरा शिकवण बुद्धाची
अनुसरा शिकवण बुद्धाची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची अज्ञानी हा समाज सगळा दैवाहाती माणूस दुबळा सर्वावरती पाखर असुद्या अपुल्या मायेची अनुसरा शिकवण बुद्धाची युद्धामधुनी विनाश आहे विनाशातूनी दुःखच वाहे शस्त्राहूनही महान जगती शांती अहिंसेची अनुसरा शिकवण बुद्धाची दीप आपुला आपण व्हा रे तम अज्ञाना दूर करा रे हृदयी अपुल्या ओढ असुद्या सम्यक ज्ञानाची अनुसरा शिकवण बुद्धाची जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची